Ad will apear here
Next
उत्स्फूर्त प्रतिसादात ‘वॉटर कप’ स्पर्धेला सुरुवात..

आमीर खानपुणे : अभिनेता आमीर खान याच्या ‘पाणी फाउंडेशन’ संस्थेतर्फे गेले काही वर्षं आयोजित करण्यात येणाऱ्या बहुचर्चित ‘वॉटर कप’स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ मे, ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत कालपासून पुण्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.    

आमीर खान आणि किरण रावआमीर खान आणि त्याचे इतर सहकारी यांच्या आवाहनानंतर या स्पर्धेसाठी अनेक गावे पुढे आली असून, या उपक्रमात ग्रामीण भागातील लोकांसह शहरातील नागरिकही मोठया संख्येने सहभागी होताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या वाघापूर गावात सकाळपासूनच श्रमदानाला सुरुवात झाली. याठिकाणी श्रमदानात पुणे आणि मुंबईचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

विशेष बाब म्हणजे या उपक्रमात वृद्धांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसला. वाघापूर येथील ८५ वर्षांच्या आजी सुमन लहाने यांनी श्रमदानामध्ये खारीचा वाटा उचलला, तर चिमुरड्यांनीही मोठ्या उत्साहाने कुदळ, विळा, फावडे या साधनांचा पहिल्यांदाच वापर करून काम केले. 

सामान्य नागरिकांच्या बरोबरीने सिनेक्षेत्रातील काही मराठी कलाकारही या उपक्रमात सहभागी झाले. वाघापूर इथे सिनेक्षेत्रातील मंडळींमध्ये गिरीश कुलकर्णी, अमेय कुलकर्णी, ज्योती सुभाष, किरण यद्नोपवित हे सहभागी झाले होते.

('वॉटर कप' स्पर्धेतील श्रमदानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZZNBO
Similar Posts
‘माती, गवत, पीकनियोजनावर काम केल्यासच दुष्काळाला हरवणे शक्य’ पुणे : ‘पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट क्षेत्रात मोठे काम झाले आहे आणि लोकांमध्ये जागृती झाली आहे; मात्र त्यासोबतच आता माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावे लागणार आहे. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात केले
वॉटर कप स्पर्धेत सोलापूरची उत्तम कामगिरी सोलापूर : पानी फाउंडेशनच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या चौथ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी (ता. बार्शी) गावाला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तालुका पातळीवर मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर गावाने प्रथम, नंदेश्वरने दुसरा, तर डोंगरगावाने तिसरा क्रमांक मिळवला
‘स्नेहांकुर’ करणार ग्रामीण भागात शालेय साहित्याचे वाटप पुणे : ‘स्नेहांकुर – द रे ऑफ होप’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे या वर्षी भोर, वेल्हे, पुरंदर, काळदरी, रायरेश्वर पठार या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. ६० शाळांतील सुमारे २२०० गरजू विद्यार्थ्यांना हे वाटप केले जाणार आहे.
जलक्रांतीसाठी श्रमदान; पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ आणि ‘पाणी फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून जलक्रांतीसाठी राज्यभर ठिकठिकाणी करण्यात येत असलेल्या श्रमदानात समाजाच्या अनेक स्तरांतील नागरिक सहभाग घेत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील कोथरूडमधील ‘वूडलँड सोसायटी’च्या सदस्यांनीही या कामाला हातभार लावून या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घेतला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language